पेन्शनवाढीसाठी शिवसेना आक्रमक
By admin | Published: April 12, 2017 11:37 PM2017-04-12T23:37:07+5:302017-04-12T23:37:42+5:30
विविध मागण्या : क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्तांना निवेदन
सिडको : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून १९९५ च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सर्वच पेन्शनधारकांना त्वरित पेन्शनवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अरु ण कुमार यांना दिले.
आयुष्यभर काबाडकष्ट करत हजारो रुपये कर भरायचा, भविष्य निर्वाह निधी पगारातून कपात द्यायची आणि निवृत्तीनंतर तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची नामुष्की कामगार वर्गावर आली आहे. सेवानिवृत्तांना दुर्लक्षित करून सामाजिक विकास होऊच शकत नाही. सेवानिवृत्तांना त्यांच्या किमान गरजा, औषधे यांचा खर्च निघेल एवढी पेन्शन मिळावी यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शिवसेनेचे नगरसेवक तिदमे यांनी या सेवानिवृत्तांकडून पंतप्रधानांकडे पाठविले जाणारे आणि पेन्शन वाढीचे विनंती अर्ज भरून घेऊन ते पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यास सुरु वात केली आहे. नाशिक शहरासह देवळा, सटाणा, शिंदे, निफाड अशा विविध भागातील हजारो पेन्शनधारकांनी हे अर्ज भरून दिले आहेत. याच संदर्भात एच.ए.एल. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी पंतप्रधान कार्यालयाशी ईमेलद्वारे पाठपुरावा सुरू केला आहे. शुक्र वारी प्रवीण तिदमे यांनी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अरु ण कुमार यांची भेट घेऊन पेन्शनवाढीसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाने पेन्शनवाढीसाठी आदेश दिले असतानाही कार्यवाही केली जात नसल्याबाबत तिदमे यांनी तक्र ार केली. दिल्लीतील अपर केंद्रीय भविष्य निधी आयुक्तांनीही याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेशित केले असल्याचेही नगरसेवक तिदमे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. महागाई आणि वयस्कर भारतीयांची कैफियत लक्षात घेऊन १९९५ च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सर्वच पेन्शनधारकांना त्वरित पेन्शनवाढ द्यावी, अशी मागणीही केली. आयुक्त कुमार यांनीही पेन्शनधारकांची मागणी मुख्य कार्यालयाकडे सकारात्मकरीत्या पाठविण्याचे आश्वासन दिले. पेन्शनवाढीसाठी आता केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे प्रवीण तिदमे यांनी सांगितले. (वार्ताहर)