शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:50 AM2018-02-17T01:50:09+5:302018-02-17T01:50:23+5:30
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी दिली.
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी दिली. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १५) तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी शहरातील प्रमुख प्रश्नांची मांडणी मुंढे यांच्यापुढे केली. मुंढे यांनी यापूर्वी ठिकठिकाणी दाखविलेला लौकिक नाशिक महापालिकेतही कायम राहील आणि नाशिकमध्ये पहिल्यांदा ते आपल्या पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. विरोधाला विरोध म्हणून सेनेची भूमिका राहणार नसून सकारात्मक भूमिकेला प्राधान्य देत विधायक कामांसाठी पाठीशी राहण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, सुदाम डेमसे, चंद्रकांत खाडे, रंजना बोराडे, कल्पना चुंभळे, सूर्यकांत लवटे, नयन गांगुर्डे, सुनील गोडसे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.