रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:29+5:302021-04-13T04:13:29+5:30
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हातान्हात रांगेत उभे ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे, यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांची गुरुवारी (दि. ८) शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड प्रमाणात टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना औषधाच्या दुकानांमध्ये रांगा लावून औषधे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक हे इंजेक्शन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली तर आता रुग्णांच्या नातेवाइकांना औषध दुकानात इंजेक्शन आणण्यासाठी जाण्याची गरज नाही त्याऐवजी रुग्णांच्या रुग्णालयात दाखल असेल तेथेच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे दुष्यंत भामरे यांनी सांगितले. मात्र रुग्णालयातही इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी बडगुजर यांनी यावेळी केली.
---
छायाचित्र एनएसके एडिटवर..
नाशिक शहरातील रेमडेसिवीर इंजेक्शन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांना निवेदन देताना शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर. समवेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे.
===Photopath===
080421\410908nsk_43_08042021_13.jpg
===Caption===
नाशिक शहरातील रेमडीसीवर इंजेक्शन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे यांना निवेदन देताना शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, समवेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे.