शिवसेनेचे गट आमने-सामने; कुणाला पावणार मऱ्हार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:31+5:302021-01-08T04:41:31+5:30

दशकापूर्वी चंदनपुरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना असे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार व सेनेचे अकरा ...

Shiv Sena groups face to face; Who will be killed? | शिवसेनेचे गट आमने-सामने; कुणाला पावणार मऱ्हार!

शिवसेनेचे गट आमने-सामने; कुणाला पावणार मऱ्हार!

Next

दशकापूर्वी चंदनपुरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना असे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार व सेनेचे अकरा उमेदवार निवडून आले होते. दहा वर्षांपासून चंदनपुरीत सेनेचे वर्चस्व आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत सेनेची सत्ता पुन्हा आली. आरक्षणानुसार योगीता अहिरे या युवतीला सरपंचपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर राजकारण बदलले. राष्ट्रवादीचे सदस्य कार्यकर्ते सेनेसोबत दिसू लागले. यंदाच्या निवडणुकीत चंदनपुरी ग्रामपालिका निवडणूकसाठी माजी सरपंच राजेंद्र पाटील व सूर्यकांत पाटील यांचे साई मल्हार पॅनल तर माजी सदस्य विनोद शेलार यांचे शिव मल्हार ग्रामविकास पॅनल यांच्यात लढत होत आहे. नितीन पाटील व मंगला पवार हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता तेरा जागांसाठी चुरस होणार आहे. सेनेचे दोन गट आपसात निवडणूक लढणार असल्याने रंगत वाढली आहे, तर कृषिमंत्री दादा भुसे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

चौकट :

चंदनपुरी ग्रामपंचायतमध्ये एकूण प्रभाग - ५

एकूण सदस्य संख्या- १५.

लोकसंख्या - सुमारे १० हजार.

मतदार : ५ हजार

इन्फो

पाच वर्षांतील विकासकामे

भूमिगत गटारी बांधण्यात आल्या.

कॉंक्रीट रस्ते

मुख्य रस्त्यावर हाय मास्ट दिवे लावले

अनेक भागात पेव्हर ब्लॉक

चौक सुशोभीकरण करण्यात आले

भक्तनिवास आदी.

इन्फो

भेडसावणाऱ्या समस्या

अधिक पाणीपुरवठा नियोजन योजना कार्यान्वित करणे

अतिक्रमण समस्या

गाव-शिव रस्ते जोड कामे अपूर्ण

कर वाढ करणेसह इतर

कोट....

दशकांपासून आमची सत्ता असून, गाव पंचक्रोशीत कामांबाबत समाधान आहे. पाणी नियोजनसह आरोग्य समस्या दूर करणे यावर उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा ही निवडणुकीत सक्षम उमेदवार दिले आहे.

- राजेंद्र नंदलाल पाटील, नेते, शिव मल्हार पॅनल

फोटो फाईल नेम : ०६ एमजेएएन ०२ . जेपीजी

गेल्या निवडणुकीत सोबत होतो; परंतु कार्यप्रणालीमुळे मतदार नाराज होते. अधिक विकासकामे अपेक्षित आहेत. त्यामुळे आम्ही शिव मल्हार ग्रामविकास पॅनलची निर्मिती केली आहे. नागरिकांना बदल हवा आहे. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा आहे.

- विनोद शेलार, नेते, शिव मल्हार ग्रामविकास पॅनल

फोटो फाईल नेम : ०६ एमजेएएन ०१ . जेपीजी

Web Title: Shiv Sena groups face to face; Who will be killed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.