शिवसेनेने २४ वर्षांत पहिल्यांदा गमाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:37 AM2019-10-26T01:37:27+5:302019-10-26T01:37:32+5:30
शिवसेनेला गेल्या चोवीस वर्षांत नाशिक जिल्ह्यात सर्वच विधानसभा निवडणुकीत चार जागांवर सातत्याने विजय मिळाला; परंतु २४ वर्षांत राज्यातील सत्तेत सहभागी असतानाही सेनेला जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी नऊ जागा सेनेच्या वाट्याला आल्या. त्यातील चार जागांवर सेनेने विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली तर अन्य पाच जागांवर उमेदवार देताना सेनेने स्थानिक समीकरणे लक्षात घेतली नाहीत. एकमेव नांदगाव मतदारसंघात एकमुखी उमेदवार म्हणून सुहास कांदे यांना उमेदवारी दिली, तर दिंडोरीमध्ये उमेदवार बदलाचा घोळ केला. इगतपुरीत निर्मला गावित यांना स्थानिक सेनेचा विरोध असतानाही त्यांची उमेदवारी थोपविली. कळवण मतदारसंघात मोहन गांगुर्डे या नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरविले. येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात संभाजी पवार यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावले व सेनेला त्याचा फटका बसला. निफाडमध्ये अनिल कदम यांच्या वर्तनाविषयी असलेली नाराजी त्यांना भोवली. मात्र त्याचवेळी मालेगाव बाह्य मतदारसंघ राखण्यात दादा भुसे यांना यश आले.