शिवसेनेच्या बैठकीत गैरहजर पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:33 PM2018-12-18T23:33:48+5:302018-12-19T00:33:57+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौºयात महत्त्वाची कामगिरी बजावणाºया नाशिकच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी मात्र ठाकरे यांच्या येत्या २४ डिसेंबर रोजी होणाºया पंढरपूर दौºयाकडे साफ दुर्लक्ष केले असून, या दौºयाच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असता, त्याकडे सर्वच प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठ फिरविली.

 At the Shiv Sena meeting, Mukhsukh on the absence of office bearers | शिवसेनेच्या बैठकीत गैरहजर पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख

शिवसेनेच्या बैठकीत गैरहजर पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख

Next

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौºयात महत्त्वाची कामगिरी बजावणाºया नाशिकच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी मात्र ठाकरे यांच्या येत्या २४ डिसेंबर रोजी होणाºया पंढरपूर दौºयाकडे साफ दुर्लक्ष केले असून, या दौºयाच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असता, त्याकडे सर्वच प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठ फिरविली. दुपारी दोन वाजता सुरू होणाºया या बैठकीसाठी जिल्हा प्रमुखच उशिराने आल्याने तब्बल दोन तास उशिराने बैठक सुरू झाली. त्यातही गैरहजर पदाधिकारी, लोकप्रतिनिधींवर तोंडसुख घेण्यात आले.
‘चलो अयोध्या’च्या धर्तीवर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरचा दौरा निश्चित केला आहे. त्यासाठी राज्यातील शिवसैनिकांना ‘चलो पंढरपूर’ची हाक देण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यातून सैनिकांना बोलविण्यात आले आहे. पंढरपूर दौºयाच्या तयारीसाठी जिल्हा शिवसेनेने नाशिक, दिंडोरी व मालेगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची बैठक दुपारी दोन वाजता बोलविण्यात आली होती. परंतु पदाधिकारीच बैठकीसाठी उशिराने दाखल झाल्याने ही बैठक चार वाजता सुरू झाली. त्यातही महानगर प्रमुख सचिन मराठे यांनी आपल्या भाषणातच जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना वेळेवर बैठकीसाठी येण्याचा टोला लगावला. नगरसेवक दीपक दातिर यांनी मनोगत व्यक्त करताना शहरात व जिल्ह्यात पक्षाच्या नगरसेवकांची संख्या मोठी असताना बैठकीसाठी माझ्यासह फक्त चार ते पाचच नगरसेवक उपस्थित राहात असतील तर कशाला बैठका बोलवितात, असा सवाल केला. या बैठकीसाठी ग्रामीण जिल्हा प्रमुख सुहास कांदे, सुनील पाटील यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीसाठी युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाºयांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. पक्षशिस्त न पाळणाºया पदाधिकारी व नगरसेवकांवर कोणाचाच वचक राहिला नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. बैठकीत गरमागरम चर्चा होत असताना पंढरपूरच्या दौºयासाठी प्रत्येक पदाधिकारी व नगरसेवकाने दोन गाड्या भरून सैनिकांना नेण्याचे ठरविण्यात आले. परंतु पदाधिकारी व नगरसेवकच गैरहजर असल्याने शिवसैनिकांना कसे नेणार, असा सवालही बैठकीनंतर काही सैनिकांनी केला.

Web Title:  At the Shiv Sena meeting, Mukhsukh on the absence of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.