शिवसेना-राष्टवादीत दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:49 AM2019-10-08T01:49:44+5:302019-10-08T01:50:14+5:30
उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
सिन्नर : उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. प्रत्यक्षात ९ उमेदवार दिसत असले तरी खरी लढत शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात होणार असल्याचे दिसते.
सिन्नर मतदारसंघात पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळे लढत राष्टÑवादी-शिवसेना असली तरी कोकाटे-वाजे गटातच लढत होईल. मनसेने सिन्नर मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. पक्षापेक्षा व्यक्तीला मानणारे कार्यकर्ते व मतदार असल्याने बंडखोरीचा प्रश्न निर्माण झाला नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व भाजप अशी चौरंगी लढत दिसत होती. मात्र खरी लढत शिवसेनेचे वाजे व भाजपचे कोकाटे यांच्यातच झाली होती. गेल्यावेळी कॉँग्रेसकडून संपत काळे, तर राष्टÑवादीकडून शुभांगी गर्जे उमेदवार होत्या. त्यात वाजे यांनी कोकाटे यांच्यावर २० हजार ५०० मतांनी विजय मिळविला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार कोकाटेवगळता सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
निवडणुकीत राष्टÑवादी, शिवसेना, बसपा, महाराष्टÑ क्रांती सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहर जनशक्ती व अपक्ष असे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत दुरंगी होणार आहे. शिवसेनेचे राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे माणिकराव कोकाटे असा दुरंगी सामना रंगणार आहे.
लोकसभेपेक्षा
२० हजार मतदार वाढले
लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत सुमारे २० हजार मतदार वाढले आहेत.
३ लाख ७७ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार
१ लाख ५८ हजार ४९४ असून, महिला मतदारांची संख्या १ लाख ४१ हजार ५८३ आहे.
रिंगणातील उमेदवार...
राजाभाऊ वाजे (शिवसेना), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), राजू मोरे (बसपा), मनोहर दोडके (महाराष्टÑ क्रांती सेना), विक्रम कातकाडे (वंचित बहुजन आघाडी), शरद शिंदे (प्रहर जनशक्ती), किरण सारुक्ते (अपक्ष), विलास खैरनार (अपक्ष) व रामचंद्र जगताप (अपक्ष).
२०१४ मध्ये होते ११ उमेदवार । यंदा आहेत एकूण ९ उमेदवार