शिवसेना, रिपाइंचा मूक मोर्चा
By admin | Published: July 21, 2016 12:12 AM2016-07-21T00:12:55+5:302016-07-21T00:15:07+5:30
सटाणा : विद्यार्थीही झाले सहभागी
सटाणा : कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्त्येचा निषेध करत त्या नराधमांना फाशी व्हावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना, रिपाइं व युवा मोर्चासह विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला.
शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मूक मोर्चा काढून ताहाराबादरोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे यांनी केले. यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
आंदोलनात जिजामाता कन्या विद्यालय, नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिवसेनेचे शहरप्रमुख शरद शेवाळे, युवा सेनेचे शहरप्रमुख सचिन सोनवणे, आनंदा महाले, रिपाइंचे शहराध्यक्ष भारत बच्छाव, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सरदार, युवक शहराध्यक्ष करण बच्छाव, युवक कार्याध्यक्ष जितेंद्र सरदार, अक्षय अहिरे, मुन्ना शिरसाठ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मंगेश खैरनार, पोपट शेवाळे, अमोल पवार, विक्र ांत पाटील, विजय सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, राजू जगताप, नंदू सोनवणे, कारभारी पगार, हेमंत गायकवाड, नाना गांगुर्डे, बाला जाधव, महेश सोनवणे, दुर्गेश विश्वंभर, भाऊसाहेब देसले, राजनसिंह चौधरी, महेंद्र सोनवणे, जिभाऊ मोरकर, दिलीप सोनवणे, संतोष जाधव, सीताराम जाधव, हर्षल सोनवणे, आशुतोष बच्छाव, आकाश बच्छाव, नाना बच्छाव, अतिश गायकवाड, अजय बच्छाव, आकाश धिवरे, जीवन गांगुर्डे, बबलू पवार, बंटी शिंदे, नागेश शेजवळ, सुरेश शिरोडे नितीन मांडवडे, नीलेश शेवाळे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)