सिन्नर, येवला, पेठमध्ये शिवसेना
By admin | Published: February 24, 2017 12:12 AM2017-02-24T00:12:54+5:302017-02-24T00:15:55+5:30
कार्यकर्त्यांचा जल्लोष : सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात माकपाचे वर्चस्व कायम
नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सिन्नर तालुक्यात सेनेला पाच, तर भाजपाला एक गट, येवल्यात सेनेला तीन, तर राष्ट्रवादीला दोन गटांवर विजय मिळविण्यात यश आले. अपेक्षेप्रमाणे त्र्यंबकेश्वरला माकपाचे वर्चस्व कायम राहिले असले तरी सेनेने एक जागा पटकावली आहे. पेठ तालुक्यात दोन गट व सहा गणांवर सेनेने वर्चस्व कायम राखले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढत आनंद साजरा केला.सिन्नर : तालुक्यात उत्कंठावर्धक ठरलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील लढतीत सहापैकी पाच गटांवर आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वर्चस्व मिळविले, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना व भाजपा यांच्यात लढत झाल्याचे दिसून आले. अन्य कोणत्याही पक्षाला खाते उघडता आले नाही.
सिन्नर महाविद्यालयाच्या जिमखान्यात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी २४ टेबल लावण्यात आले होते. प्रत्येकी दोन टेबलवर एक अशा १२ टेबलवर जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखााली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकाच वेळी सर्व गण आणि गटांची मोजणी करण्यात आली.
मुसळगाव गटात शिवसेनेची बाजी
सिन्नर शहराजवळील मुसळगाव गटात शिवसेनेने बाजी मारली. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दहा वर्षांपासून ताब्यात असलेला गट राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खेचून आणला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्या पत्नी वैशाली खुळे यांनी भाजपाच्या उमेदवार मंगल सुरेश कुऱ्हाडे यांचा एक हजार ८४५ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता संतोष कदम तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
नायगावला सेनेची बाजी
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला असलेल्या नायगाव गटात मतमोजणीस पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेच्या सुनीता सानप व भाजपाच्या कल्याणी बोडके यांच्यात चुरशीची लढत होती. मतदान यंत्राने झालेल्या मतमोजणीत भाजपाच्या कल्याणी बोडके आघाडीवर होत्या. मात्र टपाली मतमोजणीनंतर शिवसेनेच्या सुनीता सानप यांनी कल्याणी बोडके यांच्यावर अवघ्या ३ मतांनी विजय मिळवला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मुक्ता चंद्रकांत बोडके तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
कोकाटे यांचा देवपूरचा बालेकिल्ला अभेद्य
सिन्नर तालुक्यातील माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला असलेल्या देवपूर गटात एकतर्फी निवडणूक झाली. देवपूर गटात दुरंगी लढतीत माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी शिवसेनेच्या उमेदवार शीतल अशोक घुमरे यांच्यावर तब्बल सात हजार ७६५ या विक्रमी मतांनी विजय मिळवत मिनी मंत्रालयात दिमाखात प्रवेश मिळवला. सेनेच्या सुनीता सानप यांची अवघ्या तीन मतांनी बाजी
च्सिन्नर तालुक्यात सर्वात चुरशीची निवडणूक नायगाव गटात झाली. मतदान यंत्राच्या मोजणीत भाजपाच्या कल्याणी सुदाम बोडके यांनी शिवसेनेच्या उमेदवार सुनीता संजय सानप यांच्यावर अवघ्या सहा मतांनी आघाडी घेतली होती.
च्भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. ४० टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या. त्यात भाजपाच्या कल्याणी बोडके यांना आठ तर शिवसेनेच्या सुनीता सानप यांना १७ मते मिळाली.
च्राष्ट्रवादीच्या मुक्ता बोडके यांना दोन मते मिळाली तर तब्बल १३ मते अवैध ठरली. त्यामुळे टपाली मतदानाने शिवसेनेच्या सुनीता सानप यांना तीन मतांची आघाडी मिळाली. टपाली मतपत्रिकेमुळे शिवसेनेच्या सुनीता सानप चुरशीच्या लढतीत अवघ्या तीन मतांनी विजयी झाल्या. यावेळी सुनीता सानप यांचे पती संजय सानप यांना आनंदाश्रू आवरता आले नाही.
नायगाव गटाची फेरमोजणी
च्नायगाव गटात अतिशय चुरशीची व अटीतटीची लढत अनुभवायला मिळाली. शिवसेनेच्या सुनीता सानप व भाजपाच्या कल्याणी बोडके यांच्यात काट्याची टक्कर झाली. लढतीत सौ. सानप यांनी अवघ्या तीन मतांनी विजय मिळवल्यानंतर
सौ. बोडके यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला. यात कोणताही बदल झाला नाही व सुनीता सानप यांना ३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
गटात तीन तर गणात सात; आमदार कन्येचा विजय
चघोटी : इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत गटातील तीन जागा, तर गणातील सात जागा ताब्यात घेऊन वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान, शिवसेनेने इगतपुरी पंचायत समितीवर एकहाती सत्ता हस्तगत केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील घोटी गटात राष्ट्रवादीचे उदय जाधव यांनी शिवसेनेच्या निवृत्ती जाधव यांचा ५६६ मतांनी पराभव
केला, तर वाडीवऱ्हे या गटात अटीतटीची लढत होऊन आमदार कन्या नयना गावित १५२८ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या अनिता लहांगे यांचा पराभव केला.