शिवसेनेतर्फे सिन्नरला पीक विमा मदत केंद्र सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 05:45 PM2019-06-20T17:45:43+5:302019-06-20T17:45:55+5:30

सिन्नर : शिवसेनेचा ५३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध सामाजिक उपक्र म राबविण्यात आले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा केंद्रही सुरु करण्यात आले.

Shiv Sena started Sinnar's Crop Insurance Help Center | शिवसेनेतर्फे सिन्नरला पीक विमा मदत केंद्र सुरु

शिवसेनेतर्फे सिन्नरला पीक विमा मदत केंद्र सुरु

Next

सिन्नर : शिवसेनेचा ५३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध सामाजिक उपक्र म राबविण्यात आले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा केंद्रही सुरु करण्यात आले.
शिवसेना स्थापन होताना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेना प्रमुखांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. याच उद्दीष्टावर शिवसेना आजतागायत काम करत आहे. याच उद्देशाने यावर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, हा उपक्रम सक्रीयपणे राबवून या वर्षी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व पंतप्रधान पीक विमा योजनेचे मदत केंद्र आमदार राजाभाऊ वाजे यांचे संपर्क कार्यालयात सुरु करण्यात आले.
पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत मिळणाºया लाभात विमा कंपनी हलगर्जीपणा करत असल्याने लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाभर पिक विका मदत केंद्र स्थापन केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नैसिर्गक संकटाने शेती धोक्यात आली आहे. शेतकर्यांना गुंतवलेली रक्कम अर्थात भांडवल देखील परत मिळत नसल्याने शेती तोट्यात आली आहे.

Web Title: Shiv Sena started Sinnar's Crop Insurance Help Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी