शिवसेनेतर्फे विविध मागण्यांसाठी सुरगाणा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:14 AM2018-09-20T01:14:49+5:302018-09-20T01:15:05+5:30
शहरातील विकास कामे करण्यासाठी निवेदन देऊनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आल्याच्या पाशर््वभूमीवर बुधवारी शिवसेनेच्या वतीने सुरगाणा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.
सुरगाणा : शहरातील विकास कामे करण्यासाठी निवेदन देऊनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आल्याच्या पाशर््वभूमीवर बुधवारी शिवसेनेच्या वतीने सुरगाणा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. नगर पंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मध्यवर्ती चौकात चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. यावेळी येत्या २५ तारखेपर्यंत सर्व कामे तातडीने सुरू करण्याची लेखी हमी नगर पंचायत अधिकाºयांकडून देण्यात आल्यामुळे बेमुदत बंद मागे घेण्यात आला. बंद यशस्वी करण्यासाठी उप जिल्हा प्रमुख योगेश वार्डे, एकनाथ भोये, भरत वाघमारे, विजय खांबाईत, दीपक चव्हाण, अर्जुन शिंदे, प्रकाश बागुल, अजिंक्य आहेर, आदींसह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.