मनपा निवडणुकीतील पराभूतांना शिवसेना लावणार कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:30+5:302020-12-27T04:11:30+5:30
शिवसेना भवनात शनिवारी (दि.२६) पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस बडगुजर यांच्या बरोबरच व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी ...
शिवसेना भवनात शनिवारी (दि.२६) पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस बडगुजर यांच्या बरोबरच व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महापौर ॲड. यतीन वाघ, माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी तसेच योगेश बेलदार आणि संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुकांसाठी दाेन सदस्यीय प्रभाग असावेत यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे यावेळी बोरस्ते यांनी सांगितले. पराभूत उमेदवारांनी यावेळी प्रभागात उमेदवार ठरविताना सर्वांना विश्वासात घ्यावे तसेच निष्ठावानांना प्राधान्य द्यावे, सहा महिने अगोदरच उमेदवार निश्चित करावा म्हणजेच निवडणुकांना सामोरे जाणे सोपे होईल, अशा अनेक प्रकारच्या सूचना पराभूत उमेदवारांनी केल्या. प्रास्ताविक देवानंद बिरारी यांनी केले. यावेळी कैलास चुंबळे, शोभा फडोळ, तानाजी फडोळ, मनीषा हेकरे, उत्तम दोंदे, कविता म्हस्के, सचिन बनकर, शरद काळे यांच्यासह अनेक पराभूत उमेदवार उपस्थित होते.
इन्फो...
शिवसेनेची खरी लढत भाजपशीच असेल त्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिल्या. पराभूत उमेदवारांची अशाप्रकारची बैठक बोलावल्याने अनेक अल्प मताने पराभूत झालेले कार्यकर्ते पराभवाचे मर्म सांगताना भावुक झाले होते. गेल्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या टाळाव्यात, अशा मागण्याही उमेदवारांनी केल्या.
---------