रुग्णसेवेसाठी शिवसेना कधीच कमी पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:37+5:302021-04-26T04:12:37+5:30
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी दीपक चांदे यांच्यासह मित्र परिवाराच्या मदतीने, स्वखर्चातून ...
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी दीपक चांदे यांच्यासह मित्र परिवाराच्या मदतीने, स्वखर्चातून दिल्ली येथील नामांकित कंपनीकडून शंभर ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केले. त्याचे वाटप शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल, वसंत गीते, विलास शिंदे, योगेश घोलप, आर.डी. धोंगडे, योगेश बेलदार, दिंगबर मोगरे, शुभम पाटील, देवा जाधव, सुनील गोडसे, राजेंद्र वाघसरे, सुनील निरगुडे, यशवंत पवार, सागर भोजणे, रमेश गायकर, गोरख खर्जुल आदी उपस्थित होते.
चौकट===
या रुग्णांना दिले जाणार ऑक्सिजन सिलिंडर
कोरोनाबाधित रुग्णांची एचआरसीटी तपासणी केल्यानंतर, ज्या रुग्णांचा एचआरसीटी स्कोर हा आठच्या आत व ऑक्सिजन पातळी ८८ ते ९५ दरम्यान असेल, अशाच रुग्णांना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून युनायटेड व्ही. स्टॅड आदी एन.जी.ओ. मार्फत दोन ऑक्सिजन सिलिंडर वितरित करण्यात येणार आहेत. रुग्ण बरा झाल्यानंतर त्यांनी स्वत: हे दोन सिलिंडर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जमा करावयाचे आहेत. त्यामुळे पुढील रुग्णांनाही याचा लाभ घेता येणार आहे.
(फोटो २५ सेना)