शिवसेना कोऱ्या कागदावर सही करेल : राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:24 AM2018-10-21T01:24:28+5:302018-10-21T01:25:00+5:30
पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि़ २०) नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केले़
नाशिक : पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि़ २०) नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केले़
अयोध्येतील राम मंदिर हा हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचा व भावनेचा विषय असून, यावर कोणतेही न्यायालय निर्णय देऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले़
भाजपावर टीका करताना राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजपासोबत केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत गेली, मात्र सत्तेवर येताच भाजपाला हिंदुत्वाचा विसर पडला़ राम मंदिराबाबत गत चार वर्षांत काहीही झालेले नसून याबाबत खोटी आश्वासन देऊ नका. भाजपाला राम मंदिराची आठवण करून देण्यासाठीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत़ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिर तुम्ही बांधता की, आम्ही बांधू हा प्रश्न विचारणार असून शिवसेना केव्हाही राम मंदिर बांधण्यासाठी तयार असल्याचे राऊत यांनी सांगितले़
शिर्डी संस्थानच्या पैशांतून बांधलेल्या घरांच्या चाव्या मोदी यांनी गरिबांना दिल्यात खºया, मात्र या घरांसाठी सरकारने एक पैसाही का दिला नाही, असा सवाल करून राऊत यांनी मराठवाड्याला पाणी देण्यावरून राजकारण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, शहरप्रमुख महेश बिडवे, सचिन मराठे, सुहास कांदे, विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते़
मनसे व अन्य पक्ष शिवसेनेच्या भूमिकेबाबत काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नसून त्यांची चिऊ-चिऊ, काऊ-काऊ सुरूच असते, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही़ तसेच हिंदूंच्या कत्तली करा असे बोलणाºया ओवेसींकडून शहाणपणा शिकण्याची आम्हाला गरज नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला़