सटाण्यात राणे यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:41+5:302021-08-25T04:19:41+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत सटाणा शहर शिवसेना व युवासेनेने आंदोलन ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत सटाणा शहर शिवसेना व युवासेनेने आंदोलन केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांचा पुतळा जाळण्यात आला. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे सटाणा शहरातील दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी उपस्थित शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे, अरविंद सोनवणे, शरद शेवाळे, राजनसिंह चौधरी, बाजार समिती संचालक प्रभाकर रौंदळ, अनिल सोनवणे, राजेंद्र जगताप, सचिन सोनवणे, बापू कर्डिवाल, सागर पगार, मंगलसिंह जोहरी, लक्ष्मण सोनवणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो - २४ सटाणा १
सटाण्यात राणे यांच्या पुतळ्याचे दहन करताना शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, लालचंद सोनवणे, अरविंद सोनवणे, शरद शेवाळे, राजनसिंह चौधरी आदींसह शिवसैनिक.
240821\24nsk_33_24082021_13.jpg
सटाण्यात राणे यांच्या पुतळ्याचे दहन करताना शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, लालचंद सोनवणे, अरविंद सोनवणे, शरद शेवाळे, राजनसिंह चौधरी आदींसह शिवसैनिक.