शिवसेनेतील स्पर्धाच ‘पश्चिम’च्या मुळावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:06 AM2019-10-11T01:06:30+5:302019-10-11T01:07:11+5:30

नाशिक : सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक आणि त्या माध्यमातून असलेल्या प्रभावामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपकडून घेण्याची वरिष्ठ नेत्यांची तयारी होती; मात्र इच्छुकांची वाढती संख्या आणि एकाच प्रमुख इच्छुकाच्या नावाने होणारी चर्चा याबाबत पक्षाच्या सर्वेक्षणातच हा मतदारसंघ अडचणीचा दाखविण्यात आला. त्यामुळे नेत्यांनी त्यावर दावा करणे सोडले, अशी एक चर्चा सध्या पक्षात होत आहे.

Shiv Sena's competition at the root of 'West'? | शिवसेनेतील स्पर्धाच ‘पश्चिम’च्या मुळावर?

शिवसेनेतील स्पर्धाच ‘पश्चिम’च्या मुळावर?

googlenewsNext
ठळक मुद्देजागा सोडविण्याविषयी श्रेष्ठींची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सर्वाधिक शिवसेनेचे नगरसेवक आणि त्या माध्यमातून असलेल्या प्रभावामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपकडून घेण्याची वरिष्ठ नेत्यांची तयारी होती; मात्र इच्छुकांची वाढती संख्या आणि एकाच प्रमुख इच्छुकाच्या नावाने होणारी चर्चा याबाबत पक्षाच्या सर्वेक्षणातच हा मतदारसंघ अडचणीचा दाखविण्यात आला. त्यामुळे नेत्यांनी त्यावर दावा करणे सोडले, अशी एक चर्चा सध्या पक्षात होत आहे.
नाशिक शहरातील चार मतदारसंघांपैकी सध्या नाशिक पश्चिममधील संघर्ष ऐरणीवर आला आहे. नाशिक पश्चिममधील मतदारसंघ हा काहीही करून भाजपकडून काढून घ्यावा, अशी शिवसेनेची मागणी होती. त्यामुळे शिवसैनिक हट्टाला पेटले होते, तर जागा न सुटल्यानंतर सर्व इच्छुक आणि नगरसेवकांनी बैठक घेऊन या निवडणुकीत पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर घोषणाबाजीदेखील केली. त्यानंतर भाजपला बंड शमण्याची अपेक्षा असताना शिवसेना इच्छुकांनी अर्ज दाखल करून धक्का दिला आता तर शिवसेनेची सर्व रसद बंडखोरांच्या पाठीशी असल्याने भाजपत अस्वस्थता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा मतदारसंघ शिवसेनेला मिळू शकत होता; परंतु निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात पक्षाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यात शिवसेनेच्या एका अभ्यासू युवकालादेखील या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले होते असे कळते.पश्चिम मतदारसंघ म्हटले की, केवळ एकाच व्यक्तीचे नाव घेतले जाते. त्यामुळे अन्य इच्छुक नाराज तर होतीलच; परंतु त्याचा फटका पक्षाला बसू शकेल अशा प्रकारचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्याचे समजते. पक्षाने यंदा प्रथमच सर्वेक्षणाला खूप महत्त्व दिल्याने याबाबत अधिक खल करणे टाळले असेदेखील वृत्त आहे. तथापि, त्यानंतर मतदारसंघातील शिवसैनिकांची प्रबळ इच्छा बघता बंडखोरीचा विषय फारसा गांभीर्याने घेतला नसल्याचे कळते.

Web Title: Shiv Sena's competition at the root of 'West'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.