शिवसेनेची अवस्था ‘धरलं तर चावतंय’, गिरीश महाजनांची सोडला बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 05:21 AM2020-08-06T05:21:03+5:302020-08-06T05:21:58+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. पण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी प्रारंभापासूनच त्यांची द्विधा स्थिती होती.
नाशिक : राममंदिर भूमीपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जायचे की नाही, याबाबत शिवसेना आणि उद्धव ठाकरे सदैव द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळेच ई भूमीपूजन करा, असे त्यांनी सांगितले. पण जनभावना काय आहे, त्याचा विचार केला नाही. या संपूर्ण सोहळ्यात शिवसेनेची अवस्था ही धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी झाल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. अयोध्येतील भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्त नाशकात महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर ते म्हणाले,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. पण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी प्रारंभापासूनच त्यांची द्विधा स्थिती होती. ठाकरे यांनी अयोध्येला जाऊ नये, यासाठी त्यांच्या सहकारी पक्षांनी विधाने केल्याने त्यांचा गोंधळ झाला. दोन्ही पक्षांना सांभाळायची कसरत करावी लागल्याने त्यांची त्यात चांगलीच फजिती झाली असल्याची टीका महाजन यांनी केली.