रेमडीसिवर उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:30 PM2021-04-08T22:30:48+5:302021-04-09T00:29:15+5:30

नाशिक- शहरात कोरोना बधितांची यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेडमीसिवर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना उन्हा तान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Shiv Sena's demand to make it available on remediation | रेमडीसिवर उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

रेमडीसिवर उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

Next
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांची भेट

नाशिक- शहरात कोरोना बधितांची यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेडमीसिवर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना उन्हा तान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांची गुरुवारी (दि 8) शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात रेडमीसिवर इंजेक्शनची प्रचंड प्रमाणात टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना औषधाच्या दुकानांमध्ये रांगा लावून औषधे घ्यावी लागत आहेत त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक हे इंजेक्शन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तर आता रूग्णांच्या नातेवाईकांना औषध दुकानात इंजेक्शन आणण्यासाठी जाण्याची गरज नाही त्याऐवजी रुग्णांच्या रुग्णालयात दाखल असेल तेथेच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे दुष्यंत भामरे यांनी सांगितले. मात्र रुग्णालयातही इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी बडगुजर यांनी यावेळी केली.

नाशिक शहरातील रेमडीसीवर इंजेक्शन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे यांना निवेदन देताना शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, समवेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे.

Web Title: Shiv Sena's demand to make it available on remediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.