शिवसेनेचा आता जुन्या सैनिकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:19+5:302021-06-24T04:11:19+5:30
यासंदर्भात सिडको येथील माऊली मंगल कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. जुन्या शिवसैनिकांची मर्दुमकी आजच्या शिवसैनिकांत असायला हवी. ...
यासंदर्भात सिडको येथील माऊली मंगल कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. जुन्या शिवसैनिकांची मर्दुमकी आजच्या शिवसैनिकांत असायला हवी. त्यावेळेस पक्षाचा नेता खूप काही श्रीमंत नसायचा. उपाशीपोटी प्रचार करून जुन्या शिवसैनिकांनी शिवसेना गावागावात पसरवली. ही पक्षनिष्ठा आजच्या पिढीच्या शिवसैनिकात असायला हवी, अशी अपेक्षा बडगुजर यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक मामा ठाकरे, प्रवीण तिदमे, पुंजाराम गामणे, मंदा दातीर, सचिन राणे, राकेश दोंदे, राजेंद्र नानकर, कैलास चुंबळे यांनी मार्गदर्शन केले. सुभाष गायधनी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला बाळासाहेब दळवी, राजा मामा खांबेकर, योगेश बेलदार, बालम शिरसाठ, वसंत पाटील, प्रताप मटाले, नीलेश साळुंके, सुरेश पाटील, दादाजी अहिरे, राजेंद्र वाकसरे, मयुर परदेशी, बबलू सूर्यवंशी, भूषण राणे, अजित काकडे, किरण शिंदे, दादा मेढे, आबा सोनवणे, सतीश खैरनार आदी उपस्थित होते.
(फोटो २३ सेना) जुन्या शिवसैनिकांशी संवाद साधताना सुधाकर बडगुजर, समवेत प्रवीण तिदमे, मामा ठाकरे, राजेंद्र नानकर, रमेश उघडे, पुंजराम गमाणे, राहुल सोनवणे आदी.