शिवसेनेचे नीलेश कुलकर्णींसह दोन ठार

By admin | Published: January 5, 2017 01:32 AM2017-01-05T01:32:22+5:302017-01-05T01:32:37+5:30

नांदगाव येथे अपघात : नाशिकचे चौघे जखमी

Shiv Sena's Nilesh Kulkarni along with two killers | शिवसेनेचे नीलेश कुलकर्णींसह दोन ठार

शिवसेनेचे नीलेश कुलकर्णींसह दोन ठार

Next


 नांदगाव : औरंगाबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेचे निमित्त होऊन पलटी झालेल्या अपघातात नाशिक शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी व डॉ. संदीप येवलेकर हे दोघे जागीच ठार झाले. इतर चार जण जखमी झाले.
अ‍ॅड. कुलकर्णी हे आपल्या मित्रांसमवेत लासलगाव येथील हितेश पवार याच्या साखरपुड्यासाठी औरंगाबाद येथे गेले होते, तेथून परतत असताना हा गंभीर अपघात घडला. मंगळवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तरवाडे व कासारीच्या दरम्यान घाटातील वळणावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या इनोव्हास समोरून येणाऱ्या वाहनाचा धक्का बसला. धक्का एवढा तीव्र होता की, इनोव्हाचे चालक अ‍ॅड. कुलकर्णी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती तीन चार पलट्या खात गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पडली. त्यामुळे अपघात झाल्याचे सुरुवातीस कोणालाही कळले नाही. नांदगाव बाजार समितीचे कापूस कर वसुली कर्मचारी दुचाकीवरून एका कापसाच्या ट्रकचा पाठलाग करत, तिथून जात असताना खड्ड्यात पडलेल्या गाडीचे लाइट चमकले म्हणून ते उतरले. तेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळली. कर्मचारी किशोर मोरे व दशरथ हराळ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमींच्या मदतीने मोरे व हराळ यांनी अ‍ॅड. कुलकर्णी व हितेश पवार यांना नांदगाव येथील रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता दाखल केले. तर उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. जखमींमध्ये श्याम कांगले, हितेश पवार, दत्तप्रसाद विसपुते यांच्यासह चौघांचा समावेश आहे.
अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख होते, त्याचबरोबर ब्राह्मण समाजातही सक्रिय कार्यकर्ते होते. समाजातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते दर रविवारी मार्गदर्शन सत्र आयोजित करीत. अभ्यंकर प्लाझा येथे असलेले मायबोली वाचनालयही त्यांनी चालविण्यास घेतले होते. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने केली तसेच स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न मिळावे यासाठी त्यांनी दीड लाख पत्र पाठविण्याची मोहीमही घेतली होती. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यंकर प्लाझा येथे धाव घेतली. दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी नांदगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक महेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम बस्ते, राकेश चौधरी, पंकज देवकाते पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sena's Nilesh Kulkarni along with two killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.