ताहाराबाद रस्त्यावर शिवसेनेचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 11:21 PM2021-07-26T23:21:01+5:302021-07-26T23:21:20+5:30
सटाणा : पिंपळनेर सटाणा रस्त्याचे अनेक दिवसांपासून संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताहाराबाद येथील पिंपळनेर - सटाणा रस्त्यावर भरपावसात ठिय्या आंदोलन केले.
सटाणा : पिंपळनेर सटाणा रस्त्याचे अनेक दिवसांपासून संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताहाराबाद येथील पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर भरपावसात ठिय्या आंदोलन केले.
या वेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देत रास्ता रोको करण्यात आला. अनेक दिवसांपासून ताहाराबाद पिंपळनेर - सटाणा रस्त्याचे काम सुरू आहे . पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण होणे अपेक्षित असताना बांधकाम विभाग त्यात अपयशी ठरले त्यामुळे नागरिकांना पावसात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्याचे काम त्वरित करण्याच्या मागणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. तीन तास चाललेल्या आंदोलनाला इतर पदाधिकारी व नागरिकांनीही पाठींबा दिला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान , जायखेड्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आंदोलन मागे घेण्यात आले.