नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद, पण सत्ता कुठे आहे? : अरविंद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 01:25 AM2022-05-28T01:25:53+5:302022-05-28T01:26:19+5:30
नाशिक : शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेची जितकी ताकद आहे, तितकी राज्यात अन्य कोणत्याही जिल्ह्यात नाही. मात्र असे असूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार वगळता एकही शिवसेनेचा आमदार का होऊ शकत नाही असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला. शिवसेनेच्या शिवसंपर्क माेहिमेचा शुभारंभ खासदार सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.२७) नाशिकरोड येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिक : शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेची जितकी ताकद आहे, तितकी राज्यात अन्य कोणत्याही जिल्ह्यात नाही. मात्र असे असूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार वगळता एकही शिवसेनेचा आमदार का होऊ शकत नाही असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला. शिवसेनेच्या शिवसंपर्क माेहिमेचा शुभारंभ खासदार सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.२७) नाशिकरोड येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेता सुनील बागुल, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, जयंत दिंडे उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकही आमदार शिवसेनेचा नसला तरी येथील सैनिक लढवय्या आहे. विजय मिळवण्यासाठीच हे शिवसंपर्क अभियान असल्याचे ते म्हणाले.
भाजपावर कडाडून टीका करताना सातत्याने धर्म, मंदिरे, मशीद यावर बोलले जाते, स्वत:त धमक नाही म्हणून इतरांच्या खांद्यावर भगवा दिला जातो, देशात संभ्रम निर्माण केला जातो असे ते म्हणाले. आर्यन खान प्रकरणात काय झाले, आर्यन निर्दोष सुटला आता मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या, पण अशा धाडींना घाबरत नसल्याचे खासदार सावंत म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जागा वाटपात लबाडी केली. शिवसेनेला फरपटत नेण्याचा त्यांचा विचार होता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा छळ करणाऱ्यांना विसरू नका असेही सावंत म्हणाले.
यावेळी विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनात्मक कामांची माहिती दिली. त्यावेळी नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता असताना कामे झाली नाहीत, अशी टीका केली.
--