शिवसेनेच्या दोघा महानगरप्रमुखांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:23 AM2018-03-20T01:23:54+5:302018-03-20T01:24:39+5:30
शिवसेनेच्या नवनियुक्त दोघा महानगरप्रमुखांनी सोमवारी जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून दोघांचेही शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले.
नाशिक : शिवसेनेच्या नवनियुक्त दोघा महानगरप्रमुखांनी सोमवारी जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून दोघांचेही शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या निमित्ताने छोटेखानी समारंभ झाला. महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांच्या नावांची दोन दिवसांपूर्वी सेना नेतृत्वाने घोषणा केल्यानंतर सोमवारी सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सैनिकांच्या उपस्थितीत समारंभ घेण्यात आला. यावेळी बोलताना मराठे म्हणाले, पक्षाने शाखा प्रमुखापासून ते आज महानगर प्रमुखपदापर्यंत अनेक जबाबदाºया आपल्याला दिल्या. दोन वेळा नगरसेवकपदाची संधी दिली आता पक्षाने विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविण्याची संधी दिली असून, या संधीचे आपल्याला सोने करायचे आहे. नियुक्तीनंतर पहिली परीक्षा म्हणून प्रभाग क्रमांक १३ मधील महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी आपण २४ तास काम करू. तर बडवे यांनी गेल्या २५ वर्षांपासून नेते काम करीत असल्याने पक्षाने आता मोठी जबाबदारी दिली आहे. फक्त महानगरप्रमुख म्हणून आपल्यावर कोणी टीका करू नये कारण अशा टीकेमुळे पक्ष बदनाम होतो त्यावेळी मार्गदर्शन केल्यास पक्ष बळकट होईल, असे सांगितले. मावळते महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी, आजपर्यंत जे जे महानगरप्रमुख झाले त्यांना टीकेला व त्रासाला सामोरे लागले.