खासगी रूग्णालयांवर कारवाईसाठी शिवसेनेचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:20 PM2021-05-26T19:20:22+5:302021-05-26T19:24:48+5:30

नाशिक- शहरातील काही खासगी रूग्णालयांकडून काेरोना बाधीतांवर उपचा करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रूग्णालयात नियुक्त केलेले लेखा परीक्षक आणि नोडल ऑफीसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रूग्णांची पिळवणूक करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करावी असा अल्टीमेटम शिवसेनेने दिला प्रशासनाला दिला आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षाने दिला आहे.

Shiv Sena's ultimatum for action against private hospitals | खासगी रूग्णालयांवर कारवाईसाठी शिवसेनेचा अल्टीमेटम

खासगी रूग्णालयांवर कारवाईसाठी शिवसेनेचा अल्टीमेटम

Next
ठळक मुद्दे भरमसाठ बिल वसुलीची तक्रार महापालकेचे नियंत्रण नसल्याची तक्रार

नाशिक- शहरातील काही खासगी रूग्णालयांकडून काेरोना बाधीतांवर उपचा करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रूग्णालयात नियुक्त केलेले लेखा परीक्षक आणि नोडल ऑफीसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रूग्णांची पिळवणूक करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करावी असा अल्टीमेटम शिवसेनेने दिला प्रशासनाला दिला आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षाने दिला आहे.

विराेधी पक्ष नेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बुधवारी (दि.२६) प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यात महापालिकेचे लेखा परीक्षक खासगी रूग्णालयांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर शहरात अनेक रुग्णांलयांना कोविड रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वीही या रूग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी खासगी रूग्णालयांच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. महापालिकेने त्यानुसार कार्यवाही केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा भरमसाठ बिलांची वसुलीचे प्रकार सुरू झाले आहेत.  यासंदर्भात नागरीक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घेत आहेत.  
दुसऱ्या लाटेत एकेका घरात चार ते सहा रूग्ण बाधीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मिळकती मोडून बिल भरण्याची वेळ आली आहे. अनेकांनी व्याजाने देखील पैसे घेतले आहेत. मात्र अशा रूग्णांकडून भरमसाठ रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयाकडील देयकांची मनपाचे लेखापरीक्षक, नोडल ऑफीसर यांचेमार्फत तात्काळ तपासणी करून रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा अशी मागणीही बोरस्ते आणि शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Shiv Sena's ultimatum for action against private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.