पेठ पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे विलास अलबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:08 PM2019-12-31T14:08:40+5:302019-12-31T14:08:48+5:30

पेठ -येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विलास अलबाड तर उपसभापती पदी सेनेच्याच पुष्पा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 Shiv Sena's Vilas Albaad as Chairman of Peth Panchayat Committee | पेठ पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे विलास अलबाड

पेठ पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे विलास अलबाड

googlenewsNext

पेठ -येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विलास अलबाड तर उपसभापती पदी सेनेच्याच पुष्पा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी तथा तहसीलदार संदिप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रि या पार पडली. सभापती पदासाठी माळेगाव गणाचे सदस्य विलास अलबाड यांचा तर उपसभापती पदासाठी कोहोर गणातील सदस्य पुष्पा सुरेश पवार यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. तालुक्यात चार गण असून चारही जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने ही निवड बिनविरोध अपेक्षति होतीच. निवडीनंतर सकाळपासून पंचायत समतिी आवारात जमा झालेल्या शिवसैनिकांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा देत व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोस साजरा केला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमूख भास्कर गावीत, माजी सभापती पुष्पा गवळी, तुळशिराम वाघमारे, शाम गावीत, रामदास वाघेरे, अंबादास चौरे, मोहन कामडी, नंदू गवळी, सुरेश पवार, पुंडलिक महाले, मनोज घोंगे, कुमार मोंढे, नामदेव हलकंदर, काशिनाथ भडांगे, सुशिला अलबाड, लता सातपुते, संजय वाघ, पद्माकर कामडी, किरण भूसारे, राधा राऊत, छबीबाई गवळी, जाकीर मनियार, याकूब शेख, विशाल जाधव, गणेश शिरसाठ, जगदिश शिरसाठ यांचे सह पेठ तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Shiv Sena's Vilas Albaad as Chairman of Peth Panchayat Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक