कावनई किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:27 PM2020-06-06T20:27:51+5:302020-06-07T00:49:29+5:30

स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आयुष्यातील अखंड सावधानता हा महत्त्वाचा गुणच कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल, असे मत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Shiva coronation day at Kavanai fort | कावनई किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन

कावनई किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन करताना भगीरथ मराडे, बाळासाहेब भगत, महेंद्र आरोटे आदी.

Next
ठळक मुद्देमहाराजांना मुजरा । कळसूबाई मित्रमंडळाच्यावतीने पोवाड्याचे सादरीकरण

नांदूरवैद्य : स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आयुष्यातील अखंड सावधानता हा महत्त्वाचा गुणच कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल, असे मत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचे स्मरण म्हणून कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करीत शारीरिक अंतर ठेवून, मास्कचा वापर करून कावनई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी शाहीर बाळासाहेब भगत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावरील पोवाडे, गीते गायली. तर मंडळाच्या गिर्यारोहकांनी चिनी वस्तूंची खरेदी व वापर न करण्याचा संकल्प सोडला. याप्रसंगी बाळा आरोटे, अशोक हेमके, डॉ. महेंद्र आडोळे, प्रवीण भटाटे, सोमनाथ भगत, नीलेश पवार, गोविंद चव्हाण, उमेश दिवाकर, दर्शन भोर, विनायक भगत, सागर टोचे, धीरज परदेशी, भूषण चौधरी, ललित गवळी, सनी लकारे, विक्की बैरागी, तुषार भोर, शाबिर रंगरेज, लालदास बाबा, यज्ञेश भटाटे आदी उपस्थित होते.

पाथरे येथे सोहळा
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने गहिनीनाथ मंदिरात मोजक्याच तरु णांच्या साक्षीने हा सोहळा दिन साजरा केला. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. बाळासाहेब कुमावत यांनी सपत्नीक मूर्ती पूजा व अभिषेक केला. गुरू हर्षल पाटील यांनी विधिवत पूजा करून पौरोहित्य पार पाडले. यावेळी शिवाजी राजांचा मान, सन्मान, अभिमान कायम बाळगला पाहिजे आणि असे उत्सव नेहमी साजरे करून समाज एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे यावेळी मनोगतातून भारतीय जवान नारायण दवंगे, माजी सरपंच मिच्छन्द्र चिने, अमोल चिने, मनोज गवळी यांनी व्यक्त केले तर आभार बाळासाहेब कुमावत यांनी व्यक्त केले. यावेळी मनोज गवळी, मिच्छन्द्र चिने, नारायण दवंगे, वैभव गव्हाणे, श्रीराम नरोडे, सूरज जोर्वेकर, भावराव खांडगे, स्वप्नील दवंगे, धनंजय चिने, समाधान पवार, राहुल गवळी, दामोदर खळदकर, शंकर खळदकर, अविनाश सोमवंशी, संगम घुमरे, रवींद्र रहाटळ, प्रमोद सोमवंशी, तेजस चिने, विजय वाणी, गणेश रोडे आदी तरूण उपस्थित होते.
नामपूर येथे शिवराज्याभिषेक सोहळा
नामपूर : येथे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कोरोनाच्या या कठीण काळात सुरक्षेसंबंधी योग्य काळजी घेण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, शरद खैरनार, अक्षय पगार, समीर सावंत, बापू जगताप, मेघदीप सावंत, सागर अहिरे, रवींद्र पानसरे, शरद पवार, अमितअहिरे आदी उपस्थित होते.

मेशीसह परिसरात घराघरात शिवपूजन
मेशी : सध्या कोरोना व्हायरस च्या संसर्गजन्य आजाराने सगळीकडे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्र मांवर बंदी घालण्यात आली आहे. या पाशर््वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मेशीसह परिसरात घरातच शिवपूजन करुन साजरा करण्यात आला.

Web Title: Shiva coronation day at Kavanai fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.