मालेगावसह परिसरात शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:09+5:302021-02-20T04:40:09+5:30

मालेगाव : तालुक्यातील पाडळदे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ...

Shiva Jayanti in the area including Malegaon | मालेगावसह परिसरात शिवजयंती उत्साहात

मालेगावसह परिसरात शिवजयंती उत्साहात

Next

मालेगाव : तालुक्यातील पाडळदे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक युवराज पगार होते. शिक्षक माधव ठोके यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक संजय तरवटे, भारती सोनवणे, किरण पगार, अभय देशमुख, राजू आहिरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय देशमुख यांनी केले तर गोपाल पवार यांनी आभार मानले.

-----------------------------

शुभदा विद्यालय

मालेगाव : सोयगाव येथील शुभदा विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य के. डी. चंदन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतानाच पोवाडे, गीते, नाटिका सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक डी. वाय. निकम होते. साहेबराव व्याळीज यांनी आभार मानले.

–-------------------------------------

आरबीएच विद्यालय

मालेगाव : येथील आर. बी. एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका प्रमिला पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानिमित्ताने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उत्कृष्ट वक्तृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराजांची वेशभूषा करून मनोगत व्यक्त केले. उपशिक्षिका एस. आर. देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्या सुचरिता ठाकरे, एस. पी. सावंत, पर्यवेक्षिका नुरजहाँ शेख, प्रा. जे. सी. शेलार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. निशिगंधा कारे यांनी केले तर वैशाली पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Shiva Jayanti in the area including Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.