भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:35+5:302021-02-20T04:42:35+5:30
उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मुख्य अतिथी म्हणून ग्रुप कॅप्टन विनायक देवधर (नि.) उपस्थित होते. मुख्य अतिथींचे स्वागत ...
उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मुख्य अतिथी म्हणून ग्रुप
कॅप्टन विनायक देवधर (नि.) उपस्थित होते. मुख्य अतिथींचे स्वागत व सत्कार शालेय समितीचे
अध्यक्ष अतुल बेदरकर यांनी केेले. मुख्य अतिथीचा परिचय शाळेचे
समादेशक ब्रिगेडियर मंगल मसूर (नि.) यांनी करून दिला.
तद्नंतर मुख्य अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात
आले. या प्रसंगी संगीत ग्रुपच्या वतीने (कीर्तीकाव्य) पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले.
रामदंडी अर्णव वैद्य याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या
भाषणात मांडला.
तद्नंतर मुख्य अतिथींनी मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थांना रँक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्य
अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना रँक देण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थांसाठी असलेली सर्वोच्च रँक
रामदंडी कॅप्टन चिन्मय पाटील याला घोषित करण्यात आली, तर उपरामदंडी कॅप्टन म्हणून
अभिनव देसाई याला रँक प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदरकर, समादेशक ब्रिगेडियर मंगल मसूर,
विशिष्ठ सेवा मेडल (नि.), प्रभारी प्राचार्य राजेंद्र जगताप, सुपरवायझर. विशाल जोशी, विभाग
प्रमुख श्रीमती स्वाती शिंदे व जितेंद्र मगरे, मुख्य प्रशिक्षण अधिकारी कॅप्टन जितेंद्रकुमार मिश्रा आदी उपस्थित होते. (फोटो १९ भोसला स्कूल)