दिंडोरी शहरात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:41 AM2021-02-20T04:41:43+5:302021-02-20T04:41:43+5:30
गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरी शहर भगवेमय करण्यात आले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. सार्वजनिक ...
गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरी शहर भगवेमय करण्यात आले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे भव्य आरास उभी करण्यात आली होती. माजी आमदार रामदास चारोस्कर, तहसीलदार पंकज पवार, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ आदींसह सर्व नगरसेवक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख,काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड,जेष्ठ नेते बाळासाहेब जाधव,शिवाजीराव जाधव,शिवाजीराव पिंगळ,सागर पगारे,सुजित मूरकुटे,संतोष मुरकुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
दिंडोरी तालुका युवक उत्सव समितीतर्फे भव्य आरास उभारण्यात येऊन रोषणाई करण्यात आली होती. माजी आमदार रामदास चारोस्कर,तहसीलदार पंकज पवार,पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे आदी विविध मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले. उत्सव समितीचे सोमनाथ जाधव,रवी जाधव आदी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
फोटो- १९ िदंडोरी शिवजयंती
दिंडोरी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवप्रसंगी माजी आमदार रामदास चारोस्कर, रणजित देशमुख,दिलीप जाधव,सतीश देशमुख,कैलास मवाळ,सुजित मुरकुटे,संतोष मुरकुटे आदी.
===Photopath===
190221\19nsk_48_19022021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ िदंडोरी शिवजयंती दिंडोरी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवप्रसंगी माजी आमदार रामदास चारोस्कर, रणजित देशमुख,दिलीप जाधव,सतीश देशमुख,कैलास मवाळ,सुजित मुरकुटे,संतोष मुरकुटे आदी.