साल्हेर किल्ल्यावर शिवकालीन स्मृतीशिळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 03:01 PM2018-12-04T15:01:06+5:302018-12-04T15:01:29+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरूजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दाट जंगलात शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरूजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दाट जंगलात शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे. सुरत लुटीनंतर साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी असलेले छत्रपती शिवाजी महाराज व साल्हेरच्या ऐतिहासिक लढाईच्या इतिहासाला या स्मृतीशिळेच्या माध्यमातून आता उजाळा मिळणार आहे. प्रतिष्ठानतर्फे किल्याखालील प्राचीन गावात इनामदार आळीतील बुरूजाची स्वच्छता करण्यासाठी जात असतांना मार्ग निश्चितीवेळी दुर्गवीरांना दाट झाडीत मराठा धाटणीची स्मृतीशिळा आढळून आली. मात्र काटेरी झाडे झुडुपांमुळे त्यापर्यंत पोहोचणे अवघड होते. त्या जागेपर्यंत जाण्याचा मार्ग बनवल्यानंतर जमिनीत अर्धवट गाडलेले घरांचे जोते दिसले. काटेरी झुडुपे बाजुला करतांना अंगाला वरखडे बसून रक्त सुध्दा आले. अखेर सर्व अडथळे पार करून दुर्गवीरांनी ती जागा स्वच्छ करताच त्यांना एका पाठोपाठ तीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले. दुर्गवीरांनी त्या व्यविस्थत रचत जंगलातील फुले - फळे चढवुन तिला सुशोभित केले आणि त्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून पुजन केले. स्मृतीशिळेतील दिवा लावण्याच्या जागेत दिवा देखील लावला. या स्मृतिशिळा संपुर्ण दगडात असुन त्यांची उंची चार फुट व रु ंदी दिड फुट आहे. एका बाजूस हिंदु पध्दतीचे पद्म व वेलपट्टीचे चिन्ह असुन दिवा लावण्याची सोय देखील आहे. स्मृतिशिळेच्या खाली लिखान केलेले आहे. मात्र शेकडो वर्षे जमिनीत गाडले गेल्याने व दुर्लक्षति झाल्यामुळे त्यावरील अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. या मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे हेमंत सोनवणे, प्रविण खैरणार, रोहित जाधव,किशोर झोपळे, सुमित साबळे, उत्तम झोपळे यांच्यासह साल्हेर भटकंतीस आलेले नाशिक येथील युवक युवती सहभागी होत्या.