आणखी तीन महिने पाच रुपयांत शिवभोजन ; केशरी शिधापत्रिका धारकांनाही दोन महिने सवलतीचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:12 PM2020-07-02T20:12:59+5:302020-07-02T20:16:43+5:30

कोरोनामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच  रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Shiva meal at five rupees for another three months; Orange ration card holders also get grain at a discounted rate for two months | आणखी तीन महिने पाच रुपयांत शिवभोजन ; केशरी शिधापत्रिका धारकांनाही दोन महिने सवलतीचे धान्य

आणखी तीन महिने पाच रुपयांत शिवभोजन ; केशरी शिधापत्रिका धारकांनाही दोन महिने सवलतीचे धान्य

Next
ठळक मुद्देआणखी तीन महिने पाच  रुपयामध्ये शिवभोजन केशरी धापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य

नाशिक : कोरोनामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने पाच  रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेच आणखी दोन महिने केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) धापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना  आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू, नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा  सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबर पर्यंत  लागू राहणार आहे. कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिल पासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनाच्या वेळेत वाढ करण्यात आलीअसून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.  शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच आणखी दोन महिने केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना  आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार  आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख नागरिकांना  या योजनेचा फायदा होत आहे.  

Web Title: Shiva meal at five rupees for another three months; Orange ration card holders also get grain at a discounted rate for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.