शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:53 AM2019-09-17T01:53:43+5:302019-09-17T01:54:33+5:30

नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांना चांगलीच भोवली असून, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालक पदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभापतिपदही आपसूकच गेले आहे.

 Shivaji Chumbhale's post of director of market committee canceled | शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

Next

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांना चांगलीच भोवली असून, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालक पदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभापतिपदही आपसूकच गेले आहे. सहकार खात्याच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या सभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे.
गेल्या महिन्यात बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाºयास कायम करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंभळे हे बाजार समितीचे सभापती असल्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणातील पुरावे (पान ५ वर)
नष्ट करण्याचा तसेच बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन चुंभळे यांना बाजार समितीच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीला पत्र देऊन चुंभळे यांना बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक कामकाजात सहभागी न करून घेण्याच्या सूचना बाजार समिती सचिवांना देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा उपनिबंधकांच्या या पत्राला चुंभळे यांनी आव्हान देऊन बाजार समितीच्या कामकाजात सहभागी झाले होते. या संदर्भात उपनिबंधकांकडे अपिलावर सुनावणी घेण्यात आली. त्यात चुंभळे यांच्या वतीने युक्तिवाद करून ते लोकसेवक व्याख्येत बसत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. शुक्रवारी या संदर्भातील सुनावणी होऊन उपनिबंधकांनी निर्णय राखून ठेवला होता. त्याचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आला. त्यात बाजार समितीचा सदस्य या नात्याने चुंभळे यांनी पदाचा दुरुपयोग केला असून, त्यामुळे त्यांना बाजार समितीच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 
बाजार समितीचे सात सदस्य यापूर्वीच चुंभळे यांच्या विरोधात गेले असून, आता त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आल्याने सभापतिपदही आपोआपच गेले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सभापतिपदासाठी लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, त्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.

Web Title:  Shivaji Chumbhale's post of director of market committee canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.