भ्रमणध्वनीचे संभाषण मागविणार शिवाजी सहाणे : निकाल बाहेरून लिहून आणल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:26 AM2018-05-06T00:26:05+5:302018-05-06T00:26:05+5:30
नाशिक : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला.
नाशिक : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. या काळात त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित बोलू शकत नाहीत अशा परिस्थितीत ते मराठीतून निकाल कसे देऊ शकतात, असा संशय व्यक्त करीत निकाल बाहेरून लिहून आणल्याचा गंभीर आरोप राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी केला आहे. येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाºयांच्या या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार दराडे यांच्या अर्जावर सहाणे यांनी तीन हरकती घेतल्या होत्या. त्याची सुनावणी होऊन जिल्हाधिकाºयांनी रात्री साडेअकरा वाजता निकाल जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर सहाणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, दुपारी ४ वाजता जिल्हाधिकाºयांच्या समक्ष घेतलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली. साधारणत: ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले, मात्र निकाल देण्यासाठी सहा तासांचा कालावधी घेण्यात आला. जिल्हाधिकाºयांसमक्ष दोन्ही बाजूंच्या वकिलांनी इंग्रजीमध्ये युक्तिवाद केला. आमच्या वतीने मद्रास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दोन असे तीन निकाल पुराव्यादाखल देण्यात आले, असे असतानाही जिल्हाधिकाºयांनी अवघ्या चार पानांचा मराठी भाषेत निकाल दिला आहे. जिल्हाधिकाºयांचे मराठी भाषेविषयीचे ज्ञान पाहता त्यांनीच हा निकाल दिला असेल याबाबत संशय असून, बाहेरच्या व्यक्तींनी तो लिहून दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप सहाणे यांनी केला. या निकालात आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दिलेल्या निवाड्याबाबत एका ओळीनेदेखील उल्लेख केला नसून, तो कुणाच्या तरी सांगण्यावरून तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी हा निकाल लिहिला असेल तर ज्या संगणकावर त्यांनी तो लिहिला त्याची हार्डडिस्क मागविण्यात येणार आहे. शिवाय सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत जिल्हाधिकाºयांशी कोणी कोणी संपर्क साधला, त्याबाबत संभाषणाचे सीडीआरदेखील मागविण्यात येणार असल्याचे सांगून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसºया दिवशीच जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाºयांनी राजकीय प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन करताना निवडणूक आयोगाने दिलेल्या अर्जातील एकही कॉलम रिकामा ठेवल्यास अर्ज बाद होणार असल्याचे जाहीर केले होते, त्यांच्या या बैठकीची ध्वनिचित्रफीतही मागविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.