नायगावचे शिवालय यंदा सूने सुनेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:01 PM2020-08-10T17:01:20+5:302020-08-10T17:01:51+5:30
नायगाव : श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने फुलणारे शिवालय यंदा कोरोनाच्या सावटामुळे सूनेसुनेच होते.
नायगाव : श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने फुलणारे शिवालय यंदा कोरोनाच्या सावटामुळे सूनेसुनेच होते.
सिन्नर-सायखेडा रस्त्यावरील महादेव मंदिरात प्रथमच तिसºया सोमवारीही भाविकांची संख्या ओसरली असून नायगाव खोºयातील निसर्गरम्य परिसरातील असलेल्या दोन्हीही शिवालयात श्रावण महिन्यात दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी होते. विशेषत: तिसºया सोमवारी तर एकाच दिवशी दर्शनाबरोबर येथे सत्यनारायण पुजेसाठी येथे गर्दी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्वच मंदिराबरोबर येथील दोन्ही महादेव मंदिरात श्रावण महिना असूनही येथे येणाºया भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
नायगाव खोºयातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात परिसरासह जिल्ह्यातील शिवभक्त हमखास गर्दी करतात. यंदा मात्र संपूर्ण महिनाभरात अतिशय अल्प प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. सोमवारी (दि.१०) श्रावणातील तिसरा सोमवार असूनही येथे भाविकांची संख्या कमीच होती.
चौकट ...
श्रावण मासी हर्ष मानसी....या निसर्गाची महती सांगणाºया कविते प्रमाणेच या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगराच्या कुशीत असलेले हे महादेव मंदिर आहे. समोरून जाणारा रस्ता, हिरवाईने नटलेला परिसर असे आल्हादायक वातावरण येथे श्रावण महिन्यात असते. त्यामुळे येथे जिल्हा भरातून भाविकांबरोबरच शेकडो निसर्ग प्रेमीही येथे हजेरी लावतात.
(फोटो १० नायगाव)
सिन्नर-नायगाव-सायखेडा रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिरात तिसºया श्रावणी सोमवारी अशी शांतता बघायला मिळाली.