प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:54 PM2020-09-23T14:54:24+5:302020-09-23T14:54:55+5:30

ताहाराबाद : येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योनेअंतर्गत पुढील वर्षाच्या प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आले होती.

Shivar Feri to prepare the proposed planning plan | प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी

प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी

googlenewsNext
ठळक मुद्दे गावात करावयाच्या विविध कामासाठी शिवार फेरी

ताहाराबाद : येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योनेअंतर्गत पुढील वर्षाच्या प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आले होती.
शिवार फेरी वेळी सन २०२१-२२ या वर्षात गावात करावयाच्या विविध कामासाठी शिवार फेरी काढण्यात आली. यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत करावयाच्या कामाबाबत ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके यांनी माहिती देऊन चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा पवार, प्रशासक आर. एम. सुर्यवंशी, विस्तार अधिकारी पी. सी. नेरकर यांनी मार्गदर्शन केले. तलाठी तात्या खैरनार, माजी उपसरंच सीताराम साळवे, डॉ. नितीन पवार, सुमन कासारे, यशवंत पवार, कुणाल नंदन, योगेश नंदन, अरु ण नंदन, गजानन साळवे, ग्रामरोजगार सेवक अनिल सावंत, संगणक परिचालक नंदू बागुल व ग्रामस्थ उपस्थित होते. (२३ ताहाराबाद)

Web Title: Shivar Feri to prepare the proposed planning plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.