शिवार रस्ता कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 06:48 PM2021-03-13T18:48:23+5:302021-03-13T18:49:02+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के ग्रामपंचायतीने निवडणूक संपल्यानंतर व सरपंच निवडीनंतर लगेच शिवार रस्त्याचे विकासांचे काम घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के ग्रामपंचायतीने निवडणूक संपल्यानंतर व सरपंच निवडीनंतर लगेच शिवार रस्त्याचे विकासांचे काम घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सध्या परिसरातील शिवार रस्ते हे अत्यंत दयनीय अवस्थेतेतुन वाटचाल करीत आहे. तसेच ग्राम विकासांसाठी शिवार रस्त्याचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. ही बाब लक्षात घेऊन म्हेळुस्के ग्रामपंचायतीचे नवीन सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे यांनी तात्काळ ग्रामबैठक घेऊन शिवार रस्ते विकासासाठी पाऊल उचलले व त्यांचा प्रारंभ लगेच करण्यात आला. त्यामुळे म्हेळुस्के येथील शेतकरी, ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी विनायक बर्डे, शिवराम बर्डे, माजी सरपंच गोटीराम बर्डे, शंकर बर्डे, भगवंत बर्डे, सचिन बर्डे, चिंतामण बर्डे, दीपक बर्डे, काळू बर्डे, गोपाळ बर्डे, हरी बर्डे, संतोष वायकांडे, शरद कराटे, रोहिदास गांगोडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.