नाशकात शिवजयंतीला हर्षाेल्हासात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:15 AM2018-02-19T01:15:43+5:302018-02-19T01:31:57+5:30
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे शहर अध्यक्ष सुनील बागुल, आमदार अपूर्व हिरे, संजय चव्हाण, मुकेश शहाणे, वत्सला खैरे, अजय बागुल, सचिन मोरे, हंसराज वडघुले, दिनेश चव्हाण आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. दरम्यान, रात्री शहरातील मेनरोड येथून मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत नितीन रोटे-पाटील, हिरामण वाघ, भूषण काळे, अमोल पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातून रात्री मशाल रॅली
शिवजयंती उत्सव : शिवरायांना अभिवादन
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रात्री ११.३० वाजता मेनरोड येथील गाडगे महाराज पुतळा येथून मशाल रॅली काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी करीत मेनरोड येथून मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष करीत मशाल रॅली काढण्यात आली. भगवे फेटे परिधान करून रॅलीत कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रविवारी रात्री ११.३० वाजता निघालेली मिरवणूक मेनरोडमार्गे, महात्मा गांधीरोडने रॅली जिल्हा न्यायालयासमोरील शिवाजी पुतळा येथे काढण्यात आली. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान, शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता शहरातील अनेक भागांतून कार्यकर्ते दाखल झाले होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. येथील पुतळ्यास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.