नृत्यातून उलगडली शिवभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:48 PM2017-08-20T23:48:19+5:302017-08-21T00:19:25+5:30

अतिही काम तूम करत धिटाई’ या कलावती रागातून राधा-कृष्ण यांच्यातील दाखवलेली छेडछाड तसेच पिलू रागातून सादर केलेल्या ‘कहेनवा मानो राधा रानी’ या दादरातून ज्येष्ठ नृत्यांगणा शमा भाटे यांनी राधेचा खट्याळपणा कथक नृत्यातून उलगडून दाखवला. निमित्त होते कीर्ती कलामंदिर प्रस्तुत २४व्या नटराज गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे.

 Shivbhakti unfolded from dance | नृत्यातून उलगडली शिवभक्ती

नृत्यातून उलगडली शिवभक्ती

Next

नाशिक : ‘अतिही काम तूम करत धिटाई’ या कलावती रागातून  राधा-कृष्ण यांच्यातील दाखवलेली छेडछाड तसेच पिलू रागातून  सादर केलेल्या ‘कहेनवा मानो राधा रानी’ या दादरातून ज्येष्ठ नृत्यांगणा शमा भाटे यांनी राधेचा खट्याळपणा कथक नृत्यातून उलगडून दाखवला. निमित्त होते कीर्ती कलामंदिर प्रस्तुत २४व्या नटराज गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात रविवारी (दि. २०) ‘रेझोनन्स विदीन’ या कथक आणि भरतनाट्यम् नृत्यप्रकाराचा अनोखा मिलाफ असलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगणा शमा भाटे (पुणे) आणि दीपक मजुमदार (मुंबई) यांनी भरतनाट्यम् नृत्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शमा भाटे यांनी कथक नृत्यातील वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या छेडछाडीचे ठुमरीतून सादरीकरण केले. यानंतर भाटे यांनी पिलू रागातील दादरातून राधा आणि तिची आई तसेच कृष्ण आणि राधा यांच्यातील संवादासह राधेचा खट्याळपणा दाखविण्याचा प्रयत्न केला. शमा भाटे यांनी ‘साधो रचना राम बधाई’ या राजन साजन मिश्रा यांची संगीतरचना असणाºया गुरुनानक यांच्यावर आधारित बंदिशीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात दीपक मजुमदार यांनी डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या काही बंदिशी पेश करताना शिव आणि पार्वती यांच्यातील सामना भरतनाट्यम नृत्यातून दाखविला. यानंतर पहिल्या रात्री पार्वतीने शिवाचे रूप पाहिल्यानंतर तिची झालेली अवस्था आपल्या नृत्याविष्कारातून पेश केली. शिवभक्त संकल्पेवर आधारित मुजुमदार यांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी कीर्ती कलामंदिर संस्थेने २५व्या वर्षात केलेल्या पदापर्णानिमित्त वर्षातून एकदा सोलो नृत्य सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तीन दिवस चाललेल्या महोत्सवाची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. रविवारी झालेल्या कार्यक्रमात चारुदत्त फडके (तबला), सुभाष दसककर (संवादिनी), तर रुचिरा केदार (गायन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले. या कार्यक्रमास नृत्यपे्रमींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Shivbhakti unfolded from dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.