निफाड येथे शिवजन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:22 AM2018-02-20T00:22:56+5:302018-02-20T00:24:32+5:30
निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणूक पिंपळगाव रोड, एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली.
निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणूक पिंपळगाव रोड, एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या तीर्थाने अभिषेक घालण्यात आला. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत अग्रभागी भगवे फेटे बांधलेल्या मुली, तरु णी होत्या. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. ही रॅली आंबेडकर चौक येथे आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी चौक येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रॅलीतील शिवप्रेमींना पाणी वाटप करण्यात आले.
रॅलीने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता. रॅली मामलेदार चौक, माणकेश्वर चौक, शिंपी गल्ली पेठ गल्ली मार्गे शिवाजी चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
सायंकाळी शिवाजी चौकातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या रथात मिरवणूक काढण्यात आली अग्रभागी वाद्यवृंद होता या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते निफाड शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने
तरुणांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.निफाड येथे शिवजन्मोत्सवनिफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणूक पिंपळगाव रोड, एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या तीर्थाने अभिषेक घालण्यात आला. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत अग्रभागी भगवे फेटे बांधलेल्या मुली, तरु णी होत्या. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. ही रॅली आंबेडकर चौक येथे आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी चौक येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रॅलीतील शिवप्रेमींना पाणी वाटप करण्यात आले.
रॅलीने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता. रॅली मामलेदार चौक, माणकेश्वर चौक, शिंपी गल्ली पेठ गल्ली मार्गे शिवाजी चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.
सायंकाळी शिवाजी चौकातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या रथात मिरवणूक काढण्यात आली अग्रभागी वाद्यवृंद होता या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते निफाड शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.शांतीनगर त्रिफुली, पिंपळगाव रोड, शिवाजी चौक, विंचूर रोड परिसरात भगवे झेंडे लावण्यात आल्याने हा सर्व परिसर भगवामय झाला होता. शहरात तरुणांनी आपल्या दुचाकीला मोठमोठे भगवे झेंडे लावले होते. त्यामुळे शहरातील शिवजयंती सोहळ्याला अनोखी किनार लाभली होती.