शिवनेरी शेतकरी पॅनलला बहुमत
By admin | Published: February 1, 2016 10:10 PM2016-02-01T22:10:04+5:302016-02-01T22:11:34+5:30
मनमाड कृउबा निवडणूूक : नम्रता पॅनलला अवघ्या तीन जागा
मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शिवनेरी शेतकरी विकास पॅनलने १२ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले, तर प्रतिस्पर्धी नम्रता पॅनलला मात्र अवघ्या तीन जागा जिंकत समाधान मानावे लागले आहे.
अठरा जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी सकाळी पालिका वाचनालयाच्या इमारतीमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, गंगाधर बिडगर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेरी शेतकरी विकास पॅनलने १२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळवले. या पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण गटातून अॅड. गंगाधर बिडगर (१४३), डॉ.मच्छींद्र हाके (१४५), उत्तम व्हर्गळ (१३९), भागीनाथ यमगर (१३२), किशोर लहाने (१३७), सोसायटी इतर मागासवर्ग गटातून भाऊसाहेब जाधव (१४९), विमुक्त जाती गटातून डॉ. संजय सांगळे (१५५), महिला राखीव गटातून मीराबाई गंधाक्षे (१५५), ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून राजू सांगळे (११५), अप्पा कुणगर (१०६), ग्रामपंचायत अनु.जाती गटातून दशरथ लहिरे (१२९), आर्थिक दुर्बल गटातून अशोक पवार (१३३) विजयी झाले.
चंद्रकांत गोगड यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलचे सोसायटी गटातून दीपक गोगड (१४१), आनंदा मार्कंड (१४३), महिला राखीव गटातून सुभद्राबाई उगले (१६२) हे तीन उमेदवार विजयी झाले आहे. व्यापारी गटातून कल्याणचंद ललवाणी (१४१), मानकचंद गांधी (१३७) हमाल मापारी गटातून मधुकर उगले (७०) हे विजयी झाले आहेत.(वार्ताहर)
निकाल घोषीत होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.बाजार समितिला पुनर्वेभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन संचालक मंडळ प्र्रयत्न करेल अशी ग्वाही पॅनलचे नेते सुहास कांदे,संजय पवार यांनी या वेळी बोलताना दिली.(वार्ताहर)