तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:06 PM2018-07-03T23:06:39+5:302018-07-03T23:08:44+5:30

सटाणा : शहराच्या प्रलंबित बायपास रस्त्याप्रश्नी तहसील कार्यालयात गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आक्र मक झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. यावेळी मुख्यमंत्री व महसूल विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.

Shivsainik's stance in the Tehsil office | तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देअधिकारी अनुपस्थित मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

सटाणा : शहराच्या प्रलंबित बायपास रस्त्याप्रश्नी तहसील कार्यालयात गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आक्र मक झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. यावेळी मुख्यमंत्री व महसूल विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.
शहराच्या प्रलंबित बायपास रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (दि. ३) याच प्रश्नावर सकाळी ११ वाजता तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाºयांना तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार किंवा दोनपैकी एकही नायब तहसीलदार न भेटल्याने शिवसैनिक संतप्त झाले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी प्रभारी तहसीलदारांसह दोन्ही नायब तहसीलदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र एकाही अधिकाºयाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तहसीलदारांच्या दालनातच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. घोषणा अचानक सुरू झाल्याने पोलिसांनी कार्यालयात धाव घेतली; मात्र तहसीलदारांना येथे बोलवा अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिल्याने पोलिसांनी प्रांत प्रवीण महाजन यांना याबाबत माहिती देऊन पाचारण केले.
यावेळी महाजन यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, सचिन सोनवणे, राजनसिंह चौधरी, शेखर परदेशी, सागर पगार, मंगलसिंग जोहरी, निरंजन बोरसे, महेश सोनवणे, बापू कर्डिवाल, पप्पू शेवाळे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन मागे
बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांनी कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून, लवकरच तहसीलदार म्हणून वंदना खरमाळे या रु जू होणार असल्याचे सांगितल्याने शिवसैनिकांनी एक पाऊल मागे घेतले तसेच रस्त्याप्रश्नी आपल्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिल्याने शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.

Web Title: Shivsainik's stance in the Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.