शिवसन्मान सोहळा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:13 AM2018-03-03T00:13:25+5:302018-03-03T00:13:25+5:30
येथील सिल्व्हर लोटस इंग्लिश मीडियम स्कूलने शिवाजी महाराजांच्या जीवनासह त्यांच्या गड- किल्ल्यांचा चालता बोलता इतिहास विद्यार्थ्यांसमोर सलग सहा दिवस साजरा करीत सर्वांसमोरच आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी केले.
सिन्नर : येथील सिल्व्हर लोटस इंग्लिश मीडियम स्कूलने शिवाजी महाराजांच्या जीवनासह त्यांच्या गड- किल्ल्यांचा चालता बोलता इतिहास विद्यार्थ्यांसमोर सलग सहा दिवस साजरा करीत सर्वांसमोरच आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी केले. सिल्व्हर लोटस शाळेच्या वतीने आयोजित सहा दिवसीय शिवसन्मान सोहळ्याच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, कमल बिन्नर, संतू सदगीर, अंकुर काळे, नरेंद्र बेणके, स्वराज्याचे प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे ९ वे वंशज अविनाश पिंगळे व्यासपीठावर उपस्थित होते. अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे शीतल सांगळे यांनी सांगितले. मराठी दिनाचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केल्याबद्दल त्यांनी शाळेच्या संचालक दिलीप बिन्नर व सोनल बिन्नर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले. गड-किल्ल्यांसह शिवरायांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, असे कार्यक्र म प्रत्येक शाळेत व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोरोपंत पिंगळे यांचे वंशज अविनाश पिंगळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिवचरित्रकार अंकुर काळे यांनी पिंगळे यांचा परिचय करून दिला.