देवळ्यात शिवसेनेकडून पीक विमा मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:01 PM2019-06-19T16:01:59+5:302019-06-19T16:02:32+5:30
पुढाकार : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
खर्डे : देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने देवळा शहरात पीक विमा मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात. त्यासाठीच शिवसेनेने पुढाकार घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात मदत केंद्राची उभारणी केली आहे.
अनेक शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही . परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो . भीषण दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली असून, यातून विमा कंपन्यांकडून शेतक-यांची फसवणूक झाल्याची तक्र र शेतकरी करीत आहेत . त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे . यामुळे शिवसेनेच्या वतीने पीक विमा मदत केंद्राची स्थापना करून तालुक्यातील शिवसेना शेतक-यांच्या मदतीसाठी सरसावली आहे . तालुक्यातील शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील पवार यांनी केले आहे . यावेळी शहर प्रमुख मनोज आहेर , उपशहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ ,प्रगतशील शेतकरी संजय आहेर, छोटू तासबा आहेर, दीपक आहेर, जगन भदाणे, प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते .