शिवसेना तालुकाप्रमुखाचा गौणखनिज घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:21 AM2017-07-22T01:21:03+5:302017-07-22T01:21:33+5:30

नाशिक : पेठ तालुका शिवसेना प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य भास्कर गोपाळ गावित यांनी शासनाचा ३०० कोटींचा महसूल बुडवून घोटाळा केल्याचा आरोप माकपचे जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Shivsena Taluka's head of mining scam | शिवसेना तालुकाप्रमुखाचा गौणखनिज घोटाळा

शिवसेना तालुकाप्रमुखाचा गौणखनिज घोटाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पेठ तालुका शिवसेना प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य भास्कर गोपाळ गावित यांनी सरकारी जमिनीवर कोणतीही गौणखनिज उत्खननाची परवानगी न घेता २००६ पासून आजपर्यंत केलेल्या गौणखनिज उत्पन्नातून शासनाचा ३०० कोटींचा महसूल बुडवून घोटाळा केल्याचा आरोप माकपचे जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत केला. पेठ येथील ग्रामपंचायत मालकीच्या गायरान जमीन गट क्रमांक २२३, २२४ व २३५ या गटक्रमांकामध्ये खडीक्रशर व डांबर प्लांट टाकून सन २००६ पासून सरकारी जमीन गट क्रमांक २२३ व २२४ वर गौणखनिजाची खदाण व डांबर प्लांट टाकून उत्खनन सुरू केले. यासाठी कोणतीही सरकारी परवानगी न घेताच हे वर्षानुवर्ष उत्खनन करून सरकारचा गौणखनिजाचा सुमारे ३०० कोटींहून अधिक रकमेचा महसूल बुडविल्याचा आरोप सुनील मालुसरे, अ‍ॅड. दत्तू पाडवी, नामदेव मोहनकर यांनी केला. या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार भागवत डोईफोडे, सोनवणे, कडलग तसेच विद्यमान तहसीलदार हरिष भांबरे यांच्या कार्यकाळात हा कोट्यवधी रुपयांचा घोेटाळा झाला आहे. संबंधित व्यक्तीला राजकीय दबावापोटी ५१ लाखांंच्या दंडाची कारवाई केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे आपण पाठपुरावा करीत असल्याचे माकपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भास्कर गावित यांचा पेठ शहरात तीन कोटींहून अधिक रकमेचा बंगला आहे. शिवाय पेठ शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला लागून असलेल्या स्टोन क्रशरमुळे धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. तक्रारीनंतर तहसीलदारांनी स्टोन क्रशरवर कारवाई करीत विद्युत जोडणी खंडित केली आहे. स्थानिक अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करणारा अहवाल पाठवून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई न केल्यास विधानसभा व लोकसभेत याविरोधात आवाज उठविण्यात येणार असल्याचे सुनील मालुसरे व अ‍ॅड. दत्तू पाडवी यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर गावित, गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Shivsena Taluka's head of mining scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.