‘स्वीकृत’साठी शिवसेनेचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:39 AM2017-09-27T00:39:22+5:302017-09-27T00:39:30+5:30
महापालिका आयुक्तांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्याकरिता येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत मुदत दिल्यानंतर शिवसेनेने भाजपाच्या नादाला न लागता मंगळवारी (दि.२६) आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. शिवसेनेने दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज दाखल केले असून, महासभेच्या पूर्वी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. आता शिवसेनेने अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतल्यानंतर भाजपाची प्रतीक्षा आहे.
नाशिक : महापालिका आयुक्तांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्याकरिता येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत मुदत दिल्यानंतर शिवसेनेने भाजपाच्या नादाला न लागता मंगळवारी (दि.२६) आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. शिवसेनेने दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज दाखल केले असून, महासभेच्या पूर्वी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. आता शिवसेनेने अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतल्यानंतर भाजपाची प्रतीक्षा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून स्वीकृत सदस्यांची निवड रखडली आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे तीन, तर शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होऊ शकतात. मात्र, भाजपात तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने एकमत होण्यास विलंब लागत आहे. त्यातच पालकमंत्र्यांसह आमदारांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावांचा आग्रह धरल्याने मोठी चुरस निर्माण झालेली आहे. शिवसेनेने मात्र चार नावांची घोषणा करत आघाडी घेतली. केवळ भाजपाच्या विनंतीवरून सेनेने नावे आयुक्तांकडे सुपूर्द केली नव्हती. महापालिका अधिनियमानुसार, सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांची निवड होणे आवश्यक आहे. परंतु, सहा महिने लोटले तरी स्वीकृतला मुहूर्त लागत नसल्याने प्रशासनही पेचात सापडले आहे. यापूर्वी दोनदा मुदत देऊनही सेना-भाजपाने स्वीकृतसंदर्भात नावे न दिल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२५) सेना-भाजपा पदाधिकाºयांची बैठक बोलाविली होती. यावेळी, आयुक्तांनी येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत नावे देण्याची सूचना केली. यापुढे मुदतवाढ देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपा पदाधिकाºयांनी मात्र, दिवाळीपर्यंत मुदत वाढवून देण्याचा आग्रह धरला परंतु, आयुक्तांनी त्यास नकार दर्शविला. दरम्यान, मंगळवारी शिवसेनेने भाजपावर निर्भर न राहता आपल्या उमेदवारांचे अर्ज अतिरिक्त आयुक्त रमेश पवार व नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे सादर केले. शिवसेनेने सुनील गोडसे, काशीनाथ तथा राजेंद्र वाकसरे, अलका गायकवाड आणि अॅड. श्यामला दीक्षित यांचे अर्ज दाखल केले. यातील दोहोंची स्वीकृत नगरसेवकपदासाठी लॉटरी लागणार आहे.