शिवसेनेचे भाऊ, दादा, नाना, अण्णा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:58 AM2018-02-12T00:58:07+5:302018-02-12T01:03:00+5:30
नाशिक : शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग्जवर अशा प्रकारची नावे लिहू नयेत, अशी तंबीच युवराजांनी दिली असल्याने खरी नावे लिहिण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.

राजकारणात मोठे होणारे आणि होऊ इच्छिणारे नेते, कार्यकर्त्यांमध्ये भाई, दादा, नाना, आप्पा, अण्णा, काका, मामा अशा प्रकारच्या विशेष नामाने प्रसिद्ध होण्यासाठी चढाओढ असते. सर्वच पक्षांमध्ये अशाप्रकारचे नाव असलेले कथित मोठे नेते बघून छोट्या कार्यकर्त्यांमध्येदेखील स्पर्धा वाढते. अशा नावानेच लोकांनी आपल्याला हाका माराव्या किंवा परिचित व्हावे, यासाठी कार्यकर्ते संबंधित नेत्याला त्या नावाने संबोधित करतातच शिवाय ही उपाख्य नामे प्रसिद्ध व्हावीत यासाठी होर्डिंग्जचा आधार घेतला जातो. असेच होणार का?युवराज आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर तूर्तास अशा प्रकारची नावे वापरणाºयांची अडचण झाली असली तरी त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील नेत्यांना समांतर संघटना रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही नाशिकमध्ये असलेल्या समांतर सेना कायम राहिल्या होत्या. संबंधित नेते अन्य पक्षांत गेले तरी सेना या नावानेच या संघटना परिचित आहेत. त्यामुळे टोपणनावांच्या मनाई आदेशाचे असेच होणार काय, असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांत चर्चिला जात आहे.