अर्जुनसागर (पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी नेण्यास शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 07:02 PM2019-02-13T19:02:20+5:302019-02-13T19:04:00+5:30

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरु देणार नाही असा इशारा दिला आहे.

Shivsena's opposition to water from the river Arjunasagar (drowned) | अर्जुनसागर (पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी नेण्यास शिवसेनेचा विरोध

सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना शिवसेनेचे तालुका प्रमुख अंबादास जाधव, शितलकुमार आहिरे, संजय रौंदळ, किशोर पवार, डा दिनेश बागूल, डॉ. पंकज मेणे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देकळवण : जलवाहिनीचे साहित्यही तालुक्यात उतरु देणार नाही ; मत्र्यांची घेतली शिष्टमंडळाने भेट

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरु देणार नाही असा इशारा दिला आहे.
दरम्यान या योजनेला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते, सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, तालुका प्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यातील शिष्टमंडळाने भेट घेऊन जलवाहिनी संदर्भात निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे.
या योजनेमुळे तालुक्यातील जनतेचे होणाºया नुकसानाची माहिती देऊन या प्रकल्पासाठी ज्या शेतकरी बांधवांनी जमीनी दिल्या त्यांना या प्रकल्पातील पाण्याचा अद्याप लाभ झाला नाही, त्यामुळे कळवणच्या जनतेसाठी पुनंद प्रकल्पातील पाणी प्रथम आरक्षित करा अशी मागणी शिवसेनेने करु न शिंदे यांचे लक्ष वेधले व पाणी प्रश्नांवर शिष्टमंडळाने चर्चा केली.
एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेऊन जलवाहिनी संदर्भात कळवण तालुक्यातील जनतेचा असलेला विरोध व तालुक्यासाठी प्रथम पाणी आरक्षित करणे आदी मागण्या संदर्भात व जनतेच्या भावना लक्षात आणुन देवू व जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यास विनंती करु अशी ग्वाही यावेळी शिष्टमंडळाला दिली.
कळवण तालुक्यातून जनतेचा विरोध डावलून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याची घोषणा केल्यानंतर सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कळवण तालुक्यातून विरोध दर्शवून थेट मंत्रालयात धाव घेऊन विरोध केला आहे. कळवण तालुक्यातील जनतेचा रोष पत्करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेचे भूमिपूजन केल्याने तालुक्यात नाराजी पसरली आहे.
शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुका प्रमुख अंबादास जाधव, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, डॉ दिनेश बागूल, संजय रौंदळ, किशोर पवार, डॉ. पंकज मेणे आदी सहभागी झाले होते.

पुनंद धरणातून सटाणा शहरास पाणी देण्यास शिवसेनेचा व तालुकावासीयांचा विरोध नाही. मात्र पाईपलाइनने पाणी नेण्याऐवजी सुळे डाव्या कालव्याद्वारे नेण्यात यावे पाईपलाइनने पाणी नेल्यास या भागातील बागायती शेती उद्धवस्त होईल. शेतकºयांच्या भावनांचा आदर करीत ह्या योजनेसंदर्भात फेरविचार करावा.
- अंबादास जाधव,
शिवसेना, तालुकाप्रमुख कळवण.

Web Title: Shivsena's opposition to water from the river Arjunasagar (drowned)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.