पाटबंधारे कार्यालयासमोर शिवसेनेचे धरणे आंदोलन
By admin | Published: April 21, 2017 12:55 AM2017-04-21T00:55:07+5:302017-04-21T00:55:18+5:30
मालेगाव : कच्च्या कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार न केल्याने सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
मालेगाव : राज्य शासनाने लघुपाटबंधारे विभागाला बोरी अंबेदरी, लुल्ले व दहिकुटे धरणातून जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्यासंदर्भात एस्टीमेट व प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार न केल्याने शिवसेनेच्या वतीने पाटबंधारे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाटबंधारे विभागाला बंदिस्त जलवाहिनी टाकण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. दुपारी शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अर्ध्या तासानंतर कार्यकारी अभियंता गुप्ता कार्यालयात आले असता त्यांच्या निदर्शनास सदर प्रकार आणून देण्यात आला. यावेळी गुप्ता यांनी प्रस्तावाचे काम सुरू असून, ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाला पाठविला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात शहर प्रमुख रामा मिस्तरी, कैलास तिसगे, भरत रायते, विजय गवळी, सुनील चांगरे, प्रवीण देसले, मगबुल अहमद, भय्या म्हसदे, शाबाज पठाण, सुनील देवरे, सुधाकर जोशी आदिंनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी )