शिवशाही बस-टँकरचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:21 AM2018-07-16T01:21:09+5:302018-07-16T01:22:57+5:30

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर ढोलबारे गावानजीक (ता.बागलाण) रविवारी (दि. १५) भरधाव शिवशाही बस व गॅस टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

Shivshahi bus-tanker accident | शिवशाही बस-टँकरचा अपघात

शिवशाही बस-टँकरचा अपघात

Next
ठळक मुद्देतीन जणांची प्रकृती गंभीर विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील ढोलबारे गावानजीक घटना

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर ढोलबारे गावानजीक (ता.बागलाण) रविवारी (दि. १५) भरधाव शिवशाही बस व गॅस टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव
येथे पाठविण्यात आले आहे.
यात दांपत्यासह लहान
मुलीचा समावेश आहे. गत पंधरा दिवसांच्या कालावधीत वीरगाव परिसरात घडलेला हा दुसरा अपघात आहे.
नाशिक येथून नंदुरबारकडे जात असलेली शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०७६९) व ताहाराबादकडून सटाण्याकडे येत असलेला गॅस टँकर यांच्यात ढोलबारे या गावानजीक शाहू पॅलेस हॉटेल परिसरात रविवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली.
धडक इतकी जोरात बसली की दोन्ही वाहने अपघातानंतर रस्त्यावर उलटली. या अपघातात शिवशाही बस व टॅँकरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. यात बस व टँकर चालकासह बसमधील १५ ते २२ प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले, तर किरकोळ जखमींवर सटाणा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.
ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात असून, गत पंधरा दिवसांच्या कालावधीत परिसरात घडलेला हा दुसरा अपघात आहे. शिवशाही बसमधील प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास करण्यात येत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला गॅस टँकर अपघातानंतर रस्त्याच्या बाजूस उलटल्याने गॅस गळती होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
तालुका प्रशासनाने तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन आवश्यक त्या गोष्टींची खातरजमा केली. टँकरमधून कोणत्याही प्रकारची गॅस गळती होत नसल्याची खात्री झाल्यानंतर विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बसमधून प्रवास करणे झाले धोक्याचे
परिवहन महामंडळाने प्रवासी वर्गासाठी सर्व सोयीसुविधांयुक्त शिवशाही बस उपलब्ध करून दिल्याने खासगी वाहतुकीकडे आकर्षित झालेला प्रवासी वर्ग शिवशाही बसकडे ओढला गेला आहे; मात्र बसचालकांच्या चुकांमुळे सद्यस्थितीत या बसचे राज्यभर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, अनेक ठिकाणी त्या साक्षात मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे या बसमधून प्रवास करणे धोक्याचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
अपघातातील गंभीर जखमींची नावे
भालचंद्र काळू शिरोडे
कुसुम भालचंद्र शिरोडे
अन्य एक मुलीचा यात
समावेश असून, नाव समजू
शकले नाही.

Web Title: Shivshahi bus-tanker accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात