शिवशाही बसेस दरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:25 AM2019-02-12T01:25:15+5:302019-02-12T01:26:30+5:30

राज्य परिवहन महामंळाच्या वतीने शिवशाही शयनयान बसेसच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. कमी झालेल्या तिकीट दरामुळे खासगी वाहतुकीसोबत सक्षमपणे स्पर्धा करून जास्तीत जास्त प्रवासी वर्ग शिवशाहीला जोडला जाईल, या अपेक्षेने तिकीट दरात कपात करण्यात आलेली आहे.

Shivshahi buses cut at rates | शिवशाही बसेस दरात कपात

शिवशाही बसेस दरात कपात

Next

नाशिक : राज्य परिवहन महामंळाच्या वतीने शिवशाही शयनयान बसेसच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. कमी झालेल्या तिकीट दरामुळे खासगी वाहतुकीसोबत सक्षमपणे स्पर्धा करून जास्तीत जास्त प्रवासी वर्ग शिवशाहीला जोडला जाईल, या अपेक्षेने तिकीट दरात कपात करण्यात आलेली आहे.
कमी झालेले तिकीट दर येत्या १३ पासून अमलात येणार आहे. खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करीत असताना नागरिकांना सुखकर व माफक सेवा उपब्ध करून देण्यासाठी नवीन तिकीटदर आकारण्यात येणार आहेत. या तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांसोबतच ज्येष्ठ नागरिकांनादेखील होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी असा प्रवास मिळणार असल्याचे राज्य मंडळाने म्हटले आहे.
नाशिक-नागपूर, नाशिक-इंदूर, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-कोल्हापूर या मार्गावरील बसेसच्या दरात कपात करण्यात आली आहे. नाशिक-नागपूर पूर्वीचे दर १८९० होते ते आता १४१५ करण्यात आले आहेत. नाशिक-इंदूर १००५ रुपयांचे तिकीट आता ८.३०, नाशिक-अहमदाबाद बसचे पूर्वीचे दर ९३५ तर आताचे दतर ८८५ आणि नाशिक-कोल्हापूर शयनयान शिवशाहीचे दर १२०५ वरून ९०० रुपये करण्यात आले आहे.

Web Title: Shivshahi buses cut at rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.